कोरची (Youth death) : इथून 20 किमी अंतरावर असलेल्या बडीमाध्ये येथे कांक्रीट रोड तयार करीत असताना तेथीलच एका 25 वर्षीय युवकाचा हात कांक्रीट मिक्सर मध्ये हात गेला. मशीन सुरू असल्याने हातासह संपूर्ण शरीर मशीन मध्ये गुंडाळल्या गेला. अशातच त्याचा मृत्यू झाला. कैलास ब्रिजलाल पुळो वय 25 वर्षे रा. बळीमाध्ये असे मृतक युवकाचे नाव आहे.
बळीमाध्ये या गावात 112 मीटर लांबीचा कांक्रीट रस्ता तयार करण्यात येत आहे.हे काम एम आर ईजीएस चे असून राजन अॅंड राज कंपनी पुणे या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कंपनीकडून महेश लाडे रा. आंधळी/ कुरखेडा यांचेकडे काम सोपविण्यात आले आहे. ( पेटी कंट्रक्टर) आज रस्त्याचे काम सुरू असताना दु. 1.30 च्या दरम्यान मशीन चा एक नट अचानक निघाला.त्या नटास पकडण्याच्या प्रयत्नात असताना कैलास पुळो यांचा उजवा हात मशीन मध्ये गेला. मशीन सुरू असल्याने हातासह संपूर्ण शरीर गुंडाळल्या गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. छातीचे बरगड्या तुटल्या.
गंभीर जखमी झालेल्या कैलास ला 108 गाडी बोलावून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.
पोलीस स्टेशन कोरची येथे मर्ग दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. शासनाच्या कामावर असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याने शासकीय नियमानुसार आर्थिक व इतर लाभ त्याच्या कुटूंबियांना देण्यात यावे अशी लोकांची मागणी आहे.