दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पारध लेआउट मध्ये आलेल्या मीना बाजारमुळे गोंधळ
पुसद (Meena Bazaar) : दरवर्षीप्रमाणे यंदाही कारला रोडवरील शहरातील पारध लेआउट मध्ये मीना बाजार आलेला आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित मनोरंजन व कार्यक्रमासाठी हा मीना बाजार नागरिकांना उपयोगी ठरेल असं वाटलं होतं. मात्र मीना बाजाराच्या संचालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची महिलांसाठी सुरक्षा नसल्यामुळे व त्या ठिकाणी गुंडगिरी टवाळखोर मुलांची छेडखानी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा मीना बाजार वादग्रस्त ठरला आहे.
काही दिवसा अगोदरच या ठिकाणी एका तरुणावर पाच तरुणांनी मीना बाजार च्या समोरच चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. तर (Meena Bazaar) मीना बाजार च्या आत मध्ये सायंकाळी आठ ते साडेदहापर्यंत त्या संख्येने शहरातील कुटुंब परिवारासह येत होती. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची व तरुणींची छेडखानी चिडीमारी होत असल्याचे प्रकरण अनेकांच्या व्हिडिओ मधून उघडकीस येत आहे.
नियमबाह्य फटाके वाजवणारी बुलेट मौत का कुवा या नावाच्या खेळामध्ये एक तरुण उघडपणे चालवीत आहे. तर छोट्या मुलांसाठी असलेल्या ट्रेनमध्ये व मोठ्या लोखंडी झुल्यांमध्ये कुठलीही सुरक्षा दिसत नाही. त्यामुळे हा (Meena Bazaar) मीना बाजार कोणत्या नियमाने या ठिकाणी आला आहे हे कळण्यास मार्ग नाही. 28 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पक्षी हा परिहार उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व निवेदन देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मीना बाजार संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर ” दैनिक देशोन्नतीने ” 27 नोव्हेंबर च्या अंकामध्ये या संदर्भात खरमरीत वृत्त प्रकाशित केले होते. याचा इम्पॅक्ट होत जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्यात. तर (Meena Bazaar) मीना बाजारच्या संचालकांनी पुसद मधून मीना बाजार हलविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी व शहरातील कुटुंबांनी आपल्या परिवारासह या मीना बाजार मध्ये मनोरंजन करण्यासाठी जात असताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी मात्र स्वतः घ्यावी हे विशेष.