Published on
:
28 Nov 2024, 10:50 am
Updated on
:
28 Nov 2024, 10:50 am
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात सोडलेल्या 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात हरियाणा राज्यातील पिंजोर येथून आणण्यात आलेल्या धोकाग्रस्त व नामषेश होण्याच्या मार्गावर असलेल्ल्या 10 गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस लावून बोटेझरी येथे सोडण्यात आले होते. ही घटना आज गुरुवारी उजेडात आली आहे. वनविभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी पाठविले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील २१ जानेवारी २०२४ ला जटायु संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्रामध्ये बिएनएसएस (BNHS) या संस्थेच्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या १० पाढऱ्या पुठ्यांचे गिधाडे (White-rumped vulture) आणण्यात आले होते. त्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्री-रिलीज एवेयरीमध्ये (Pre-realise Aviary) तज्ञांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते.
या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्रातील वातावरणाची सवय व्हावी या हेतून प्री-रिलीज एवेयरीमध्ये ठेवण्यात आले. या गिधाडांचा मागील ६ महिन्याचा दैनदिन व सुक्ष्म अभ्यास बिएनएचएस (BNHS) संस्थेच्या वैज्ञानिकांनी केला. या सर्व गिधाडांना निसर्गमुक्त करणे आवश्यक होते. त्यामुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी सर्व १० गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस (GSM Transmission Tracking Device) लावले. सदर डिव्हाईस युरोपमधून आयात करण्यात आली होती.
सदर जिपीएस लावल्यानंतर काही दिवसांच्या निरीक्षणानंतर या गिधाडांना निसर्गमुक्त करण्यात करून या तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांचे दैनंदिन हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या अभ्यासातून गिधाड संवर्धन व संरक्षणासाठी उपाय योजना निश्चित केल्या जाणार असल्याने 21 जानेवारी 2024 ला ताडोबातील बोटेझरी जंगलात 10 गिधांडाना सोडण्यात आले. त्यापैकी 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाने मृत गिधाडांचे शव एकत्रित करून शवविच्छेदनासाठी नागपुरात प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ही सर्व गिधाडे पांढऱ्या पाठीच्या प्रजातीची होती. निसर्गातील स्वछतादूत गिधाडांची संख्या कमी झाली होती. निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.