तिवस्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काळोखाचे साम्राज्य; पथदिवे बंद:6 महिन्यांपासून अशीच परिस्थिती, जबाबदारी स्वीकारायला कुणीही तयार नाही‎

2 hours ago 1
रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचा अख्खा परिसर गेल्या ६ महिन्यांपासून काळोखात बुडाला आहे. त्यामुळे हे रुग्णालय आहे तरी कुठे, असा प्रश्न येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना पडला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सर्वांना चक्क अंधारात चाचपडावे लागते. गेल्या ६ महिन्यांपासून या रुग्णालयात रात्रीला प्रकाशाचा लखलखाट असला तरी दर्शनी भागातील द्वार व रुग्णालयात ये-जा कराव्या लागणाऱ्या रस्त्यावर अंधार आहे. गेटपासून तर रुग्णालयापर्यंत जाणारा अख्खा रस्ताच अंधारात असल्याने बाहेरील रुग्णांना रात्रीच्या वेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिवसा शहर हे महामार्गावर आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात होत राहतात. रात्रीला एखादा अपघात घडला आणि अपघातग्रस्त व्यक्ती हा बाहेर ठिकाणचा असेल तर त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा मार्ग काळ्याकुट्ट अंधारामुळे मिळेनासा होत आहे. अगदी टॉर्च लावून रुग्ण, डॉक्टर्स यांना रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे रात्रीला तिवसा येथील रुग्णालय आहे कुठे? असा प्रश्न पडतो. परिणामी रुग्णांची भटकंती होत आहे. पत्रव्यवहार चुकला रुग्णांना वाचवण्याचे काम या रुग्णालयात केले जाते. परंतु रुग्णालयासमोर गेल्या काही महिन्यांपासून अंधार पसरला आहे. या अंधाराला उजेडात नेण्यासाठी विभागाने दक्ष व्हावे म्हणून लोकप्रतिनिधीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. - राहुल पोटे, तिवसा. रुग्णालय प्रशासनाने पथदिव्यांबाबत विद्युत विभागाशी पत्रव्यवहार करण्याऐवजी चुकीने आमच्याकडे केला. पथदिव्यांची दुरुस्ती आमच्याकडे येत नसली तरी त्यांचे पत्र आम्ही विद्युत विभागाकडे पाठवले. - श्री. विनोद बोरसे, उपविभागीय अभियंता, सा. बां. तिवसा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article