दिव्य मराठी अपडेट्स:राज्यात वेगवेगळे पक्ष, विचारधारा, संघटनांचे पाच दसरा मेळावे; राजकीय संदेश दिले जाणार

6 days ago 3
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स आज पाच दसरा मेळाव्यांमधून राजकीय संदेशाचे ‘सोने लुटणार’ छत्रपती संभाजीनगर - दसऱ्यानिमित्त 12 आॅक्टोबर रोजी राज्यात वेगवेगळे पक्ष, विचारधारा, संघटनांचे पाच दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. आगामी विधानसभेसाठी या मेळाव्यातूून विविध राजकीय संदेश दिले जातील. अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; स्टार प्रचारकाचे काम करणार मुंबई - अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांचे पक्षात स्वागत केले. शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक बनून राज्यभर प्रचार करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ मुंबई - महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्या 15 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. मात्र केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच हे अर्ज भरावे लागतील, अशी अट घालण्यात आली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली. ज्याद्वारे वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसाह्य दिले जाते. सुरुवातीला 15 जुलैपर्यंत नोंदणीसाठी मुदत होती. नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत व आता 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अजून 23 लाख अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र-त्रिपुरा सामना आज छत्रपती संभाजीनगर - जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर बीसीसीआयतर्फे आयोजित सी.के. नायडू 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा सामन्याचे 13 ऑक्टोबरपासून आयोजन करण्यात आले आहे. हा चारदिवसीय सामना आहे. संभाजीनगरात यंदा बीसीसीआयचे एकूण 18 सामने होतील. परभणी महापालिकेच्या‎निविदा प्रक्रियेवर आक्षेप‎ परभणी‎ - येथील शहर महापालिकेच्या वतीने‎औषधी खरेदी संदर्भात निविदा‎काढण्यात आली आहे. या‎निविदेतील अटी व इतर सूचना‎जाचक असल्याबाबत महाराष्ट्र‎युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस‎अमोल जाधव यांनी महापालिका‎आयुक्तांना बुधवारी निवेदन सादर‎केले आहे. निविदेत औषधी नमुने‎तपासून घेण्याविषयी सूचना देण्यात‎आल्या आहेत. विशेष म्हणजे‎निविदेमध्ये एनएबीएल, एफडीए‎रिपोर्टची अट आधीच नमूद आहे.‎प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वाक्षरी‎घेण्याविषयी कळवले आहे. मात्र‎पुरवठा आदेशानंतर ही अट असणे‎आवश्यक होते, असा आक्षेप‎नोंदवण्यात आला आहे.‎ महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा पुणे - महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर गोसेवा क्षेत्रात विविध प्रकारचे उल्लेखनीय कार्य व शासन निर्णय देखील झाले. नुकतेच, शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत 828 गोशाळा असून त्यामध्ये एक लाख 23 हजार 389 पशुधन आहे. यामधील देशी गोवंशाच्या पोषणासाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कापसाच्या हमीभावासाठी‎ढोल बजाओ आंदोलन‎ परभणी‎ - जिल्ह्यातील प्रत्येक गावात‎शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीसाठी‎केंद्र सुरू करावे, कापसाला 10 हजार‎रूपये हमीभाव द्यावा या व इतर‎मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे‎गटातर्फे, आमदार डॉ.राहुल पाटील‎यांच्या नेतृत्वात ढोल बजाओ‎आंदोलन करण्यात आले.‎जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी‎11 रोजी हे आंदोलन झाले.‎ नाफेडचे खरेदी केंद्र तात्काळ सुरू‎करावे, सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू‎करावे, शेतकऱ्यांना 24 तास‎वीजपुरवठा, बॉण्डची किंमत 100‎रुपये पूर्ववत ठेवावी, 100 टक्के पीक‎विमा देण्यात यावा, आनंदाचा शिधा‎कपात न करता संपूर्णपणे वाटप‎करावा, अशा मागण्या मांडल्या.‎ ओमर अब्दुल्ला यांचा बुधवारी शपथविधी शक्य श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील आघाडीने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. यासह केंद्रशासित प्रदेशात पहिले सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. भावी मुख्यमंत्री उमर यांनी शुक्रवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. काँग्रेससोबतच आपच्या 1 आणि 4 अपक्ष आमदारांनीही एनसीला पाठिंबा दिला आहे. बुधवारी शपथविधी शक्य आहे. यापूर्वी गुरुवारी एनसीने ओमर यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ 2009 ते 2014 पर्यंत होता. आता प्रादेशिक पक्षांशी आघाडी नाही : मायावती लखनऊ - बसप प्रमुख मायावती यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. यापुढे कोणत्याही प्रादेशिक पक्षासोबत आघाडी केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हरियाणात पक्षाने इनेलोशी आघाडी केली होती. परंतु एकाही जागी विजय मिळाला नाही. बसप रालोआ तसेच इंडिया आघाडीशीदेखील अंतर राखेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article