दीपक आबांना अधिक अधिकार देणे महागात पडले:माजी आमदार पाटील यांची खंत, महूद येथे बैठक घेऊन शिवसैनिकांशी साधला संवाद
1 hour ago
2
सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भरभरुन निधी आणला. या निवडणुकीत मतदार बंधूं - भगिनींनी ९१ हजार मते देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली. त्याबाबत मतदारांचे आभार मानतो. दीपक साळंुुखे यांनी मला पाठिंबा द्यायला हवा होता. मी त्यांना लहान भाऊ मानून आमदारकीचे 50% अधिकार दिले. हे अधिकार मी माझ्या शिवसैनिकांना दिले असते तर माझा पराभव झाला नसता अशी खंत माजी आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार शहाजी पाटील यांनी महुद येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बोलावली होती. यावेळी पराभवाबद्दल चिंतन करण्यात आले. पुढे बोलताना पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सांगोला तालुक्यावर व माझ्यावरती खूप मोठे प्रेम व उपकार आहेत.अडीच वर्षात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल 5 हजार 500 कोटी रुपये विकास निधी मिळाला. या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून जाऊ नये व नाराजही होऊ नये. आपण सर्वांनी मोठ्या जिद्दीने, धाडसाने व उमेदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही असा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे .यापुढे सर्वांनी एक दिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दादासाहेब लवटे, दीपक पवार, विजय शिंदे, रमेश बनसोडे, विकास मोहिते आदी उपस्थित होते. अखेरच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या विश्वास पात्र राहून एकही काम आडू देणार नाही. कोणी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. माझा पराभव झाला म्हणून या सुडाचे राजकारण करणार नाही. यापुढेही तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान देण्यास सदैव तत्पर आहे. येणाऱ्या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवधनुष्याचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत येत्या दोन महिन्यात मला मोठे पद मिळेल असा विश्वास माजी आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला. 2 महिन्यात मोठे पद मिळणार
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)