देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचा मजबूत चेहरा:सर्वात जास्त आमदार असूनही मोठा त्याग करून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले - रवी राणा

2 hours ago 1
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचा मजबूत चेहरा आहेत. सर्वाधिक आमदार असतानाही त्यांनी मोठा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्विकारले, अशी भावना अपक्ष आमदार रवी राणा यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत मोठा त्याग करण्याची तयारी दर्शवण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याविषयी महत्त्वाचे संकेत दिलेत. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी भाजप नेतृत्वताच्या सुरात सूर मिसळत उपरोक्त भावना व्यक्त केली आहे. रवी राणा म्हणाले, सर्वाधिक आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मोठा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. भाजपने त्यात करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. ही गोष्ट स्वतः शिंदे यांनाही माहिती आहे. महायुतीमध्ये सर्वात मजबूत चेहरा म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. किंबहुना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देणे, हा त्याग त्यांनी करून दाखवला आहे. भजापचे भारतीय बंधू कटप्पाच्या भूमिकेत रवी राणा यांनी यावेळी आपल्या पत्नी तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारणही यावेळी सांगितले. ते म्हणाले, ज्यांनी भाजपचे कार्यालय उघडेल त्यांनीच लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात काम केले. भाजप आमदार श्रीकांत भारतीय व त्यांचे बंधू तुषार भारतीय हे कटप्पाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी भाजप सोबत बंडखोरी केली. त्यामुळे या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. रवी राणा यांनी यावेळी महायुतीकडे आपल्या बडनेरा मतदारसंघ अचलपूर, दर्यापूर, मेळघाट या 3 मतदारसंघाचीही मागणी केली. आता पाहू काय म्हणाले होते अमित शहा? अमित शहा यांनी भाजप-शिवसेनेच्या एका बैठकीत एकनाथ शिंदे यांना त्याग करण्याची तयारी ठेवण्याची सूचना केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या बैठकीत अमित शहा म्हणाले की, शिंदेजी, मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला. आता तुम्ही आम्हाला झुकते माप द्या. या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री व तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदे केवळ व्यवस्था आहेत. कामे पूर्ण होण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकते माप द्या. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ओढली होती री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंबंधी अमित शहा यांची री ओढली होती. ते म्हणाले होते, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांचे काय बोलणे झाले, हे मला माहिती नाही. पण मुख्यमंत्रीपद हे प्रमुख असते. सरकार त्यांच्या नावे असते. आपण एकनाथ शिंदे सरकार म्हणतो. म्हणूनच आमचाही आग्रह आहे, की एवढा मोठा पक्ष आहे, आमचे इतके आमदार आहेत. आम्हालाही त्यांना सांभाळावे लागते. दोन गोष्टी आम्हाला जास्त मिळाव्यात. काही समित्या, महामंडळे मिळायला हवीत. संख्याबळानुसार एकनाथ शिंदेंनी आमच्याही पाठी उभे राहिले पाहिजे असा आमचा आग्रह आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीच्याच माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना सत्तेत सहभागी होताना जो शब्द देण्यात आला होता, तो शब्द भाजप पाळणार असल्याची माहिती आहे. यामुळेच स्वतः अमित शहा यांनी जागावाटपात सक्रीय भूमिका घेतली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article