Latur: पतीने, गोळ्या झाडून केली पत्नीची हत्या.!

2 hours ago 1

उदगीर (Latur):- मंगळवारी रात्री उदगीर शहरातील डॅम रोड परिसरात, पतीने आपल्याच पत्नीची गोळ्या झाडून हत्या (Murder) केली असल्याची घटना घडली आहे. सदरील गंभीर घटनेमुळे उदगीर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

उदगीर शहरातील घटना, नागरिकांत खळबळ..

सविस्तर वृत्त असे की, पूर्वी एका खुनाच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात असलेल्या सोनू नाटकरे नावाचा आरोपी, पॅरोलवर सुटका करून बाहेर आला होता. दरम्यान, पती आणि पत्नीत भांडण झाल्याने आरोपी पतीने थेट आपल्याच पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी, सकाळी घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article