विमानात 'बॉम्‍ब'च्‍या अफवा झाल्‍या उदंड! केंद्र सरकार उचलणार 'हे' पाऊल

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

16 Oct 2024, 11:54 am

Updated on

16 Oct 2024, 11:54 am

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "विमानात बॉम्‍ब ठेवला आहे," अशा अफवांचे पीक आले आहे. देशातील विविध ठिकाणी मागील ४८ तासांमध्‍ये तब्‍बल १० विमान प्रवाशांना या अफवांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली असून, आता विमानात एअर मार्शलची संख्‍या वाढविण्‍याचा विचार सुरु आहे. (Hoax bomb threats to flights)

विमानांमध्ये एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्‍याचा विचार

याबाबत 'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, अलीकडेच काही एअरलाइन्सकडून मिळालेल्या फसव्या बॉम्बच्या धमक्या लक्षात घेऊन सरकार अनेक पावले उचलण्याचा विचार करत आहे. यामध्‍ये विमानात एअर मार्शलची संख्या वाढवणे समाविष्ट आहे. आज (दि.१६) नागरी उड्डाण सुरक्षा विभाग आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सध्‍या नागरी उड्डाण मंत्रालय "नो-फ्लाय लिस्ट" अपडेट करण्यासाठी अफवा पसरविणार्‍यांना ओळखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत काम करत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर विमानांमध्ये एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याबाबत निर्णय घेण्‍यात येणार आहे." (Hoax bomb threats to flights)

मागील ४८ तासांमध्‍ये १० विमानांना बॉम्‍बच्‍या ठेवल्‍याच्‍या धमक्‍या 

मागील ४८ तासांमध्‍ये एकूण १० विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. अशा धमक्यांना गांभीर्याने घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत विमान वाहतुकीशी संबंधित सुरक्षा यंत्रणाही सहभागी झाल्या होत्या. ज्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशा धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यांचीही चौकशी केली जात आहे. ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून धमक्या पाठवण्यात आल्या आहेत, ते ब्रिटनसह इतर अनेक देशांमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी एकूण सात विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, तर बुधवारी इंडिगो आणि आकाशाच्या विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याचवेळी सोमवारीही विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली होती. (Hoax bomb threats to flights)

बोगस कॉल आणि धमक्‍या देणार्‍यांना किती शिक्षा होवू शकते?

बॉम्बच्या धमक्या देणे आणि बनावट फोन कॉल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात खोट्या धमक्या देणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच अशा प्रकरणांमध्ये मोठा दंडही होऊ शकतो. केलेला गुन्हा अधिक गंभीर असेल आण गुन्हेगार दोषी आढळल्यास बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (Hoax bomb threats to flights)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article