PAK vs ENG : इंग्लंडला 4 झटके देत पाकिस्तानचं अखेरच्या सत्रात कमबॅक, पाहुणे 127 धावांनी पिछाडीवर

2 hours ago 1

Sajid Khan pakistan vs england 2nd testImage Credit source: Pakistan Cricket X Account

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. इंग्लंड पहिल्या डावात अद्याप 127 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडने पाकिस्तानच्या 366 धावांच्या प्रत्युत्तरात 53 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 239 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जॅमी स्मिथ आणि बार्यडन कार्स ही जोडी नाबाद परतली आहे. आता तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडे इंग्लंडला झटपट गुंडाळून निर्णायक आघाडी घेण्याची संधी आहे. आता या प्रयत्नात पाकिस्तान यशस्वी ठरते की इंग्लंड आघाडी घेते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

पाकिस्तानने 5 बाद 259 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र इंग्लंडने 107 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव गुंडाळला. पाकिस्तानने पहिल्या डावात 123.3 ओव्हरमध्ये 366 धावा केल्या. पाकिस्तानकडून डेब्यूटंट कामरान गुलाम याने सर्वाधिक 118 धावा केल्या. तर सॅम अयुबने 77 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकालाही 50 पार मजल मारता आली नाही. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. ब्रायडन कार्सने तिघांना बाद केलं. मॅथ्यू पॉट्सने 2 विकेट्स घेतल्या. तर शोएब बशीरने 1 विकेट घेतली.

हे सुद्धा वाचा

इंग्लंडची बॅटिंग

त्यानंतर इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 73 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर झॅक क्रॉली 36 बॉलमध्ये 27 रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर बेन डकेट आणि ओली पोपने दुसऱ्या विकेटसाठी 52 धावा जोडल्या. ओली पोपने 29 धावा केल्या. त्यानंतर बेन डकेट आणि जो रुटने तिसऱ्या विकेटसाठी 86 रन्सची पार्टनरशीप केली. बेन डकेटने या भागीदारीदरम्यान कसोटी कारकीर्दीतील चौथं शतक ठरलं. मात्र साजीद खान याने रुटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रुटने 34 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 3 बाद 211 अशी झाली.

पाकिस्तानचं कमबॅक,  इंग्लंड 127 धावांनी पिछाडीवर

Pakistan adjacent time 2 connected a precocious with Sajid and Noman shining agleam 🏏

England are 239-6, trailing by 127 runs.

Scorecard: https://t.co/sDVJBTiJUN#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/qU7IHfeX8b

— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 16, 2024

मात्र त्यानंतर पाकिस्तानने अखेरच्या सत्रात कमबॅक करत इंग्लंडला 2 धावांच्या मोबदल्यात 3 झटके दिले. त्यामुळे इंग्लंडची 224 वर 3 ते 226 वर 6 अशी स्थिती झाली. शतकवीर बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि कॅप्टन बेन स्टोक्स या तिघांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आऊट केलं. साजिद खान याने बेन डकेट (114) आणि हॅरी ब्रूक (9) धावांवर आऊट केलं. तर नोमान अलीने बेन स्टोक्स याला 1 धावेवर बाद करत इंग्लंडला सहावा झटका दिला. त्यामुळे इंग्लंडची 6 बाद 225 अशी स्थिती झाली. त्यानंतर जॅमी स्मिथ आणि बार्यडन क्रॉस या दोघांनी खेळ संपेपर्यंत सावध खेळ केला आणि सातव्या विकेटसाठी 14 धावांची नाबाद भागीदारी केली.जॅमी 12 आणि कार्स 2 धावांवर नाबाद आहेत. पाकिस्तानकडून साजिद खान याने 4 तर नोमान अली याने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article