पोलिस असल्याचे सांगत तरुणीला पकडले:रिक्षा जबरदस्ती पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न, सुटकेसाठी 50 हजरांची मागणी

2 hours ago 1
राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला व मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक घटना महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत घडली आहे. एका व्यक्तीने बनावट पोलिस बनत एका महिलेकडून 50 हजारांची लाच देखील मागीतल्याची घटना समोर आली आहे. महिलेने धाडस दाखवले म्हणून हा प्रकार समोर आला आणि अनर्थ टळला आहे. मुंबईच्या पवई भागात भरदिवसा धक्कादायक घटना घडली आहे. एका रिक्षामधून एक महिला व्हेप ओढताना म्हणजे ई-सिगारेट ओढताना एका व्यक्तीने पहिले. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतः पोलिस अधिकारी असल्याचे सांगून महिलेला जबरदस्तीने ताब्यात घेतली व रीक्षा पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले. तसेच सुटका करून घ्यायची असल्यास 50 हजारांची मागणी या व्यक्तीने केली. यावेळी प्रसंगावधान राखत महिलेने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. कॅमेरा सुरू झाल्याचे पाहताच या व्यक्तीने रिक्षा थांबवत पळ काढला. विशेष म्हणजे उतरल्यावर या व्यक्तीने स्वतः ईसिगारेट ओढण्यास सुरू केले असल्याचे समजते. महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे तिच्यासोबत होणारा अनर्थ टळला. महिलेला सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तिने कॅमेरा सुरू करत, मी सध्या एमआयडीसी रोडवर आहे आणि हा माणूस माझ्यामागे येत आहे आणि ऑटो रिक्षामध्ये बसून जबरदस्तीने पवई चौकीकडे नेण्यास प्रयत्न करत आहे, असे ही महिला बोलताना दिसते. तसेच महिला पोलिसांशिवाय तुम्ही मला नेऊ शकत नाही, असे देखील या महिलेने त्या व्यक्तीस सांगितल्याचे समजते. त्यानंतर त्या व्यक्तीने पळ काढला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित समजली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबई व उपनगर भागांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढताना दिसत आहेत. तसेच फसवणूक करत पैसे उकळणाऱ्यांची देखील टोली मुंबईत सर्रास फिरत आहे. यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article