IND vs NZ: बीसीसीआयचा पहिल्या कसोटीबाबत मोठा निर्णय, नक्की काय?

2 hours ago 1

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन हे 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र पहिल्याच दिवसाच खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. बीसीसीआयने पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ हा रद्द करण्यात येत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं. या सामन्यातील पाचही दिवस पावसाचं सावट असल्याचं हवामानाच्या अंदाजानुसार सांगण्यात येत होतं. त्यानुसार पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला आहे. आता उर्वरित 4 दिवसही असेच वाया जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.अशात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

सलामीच्या सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस आणि 9 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसानेच आधीच जोरदार बॅटिंग केल्याने खेळ सुरु होऊ शकला नाही. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खेळपट्टी कोरडी होण्यास वेळ लागतो. मात्र पावसाची ये-जा सुरुच असल्याने पहिल्या दिवशी एक बॉलचा खेळ सोडा, टॉसही झाला नाही. अशात क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. आता बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने दुसऱ्या दिवशी टॉस किती वाजता होणार? तसेच खेळाला किती वाजता सुरुवात होणार? याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस होणार आहे. तर 30 मिनिटांनंतर 9 वाजून 15 वाजता सामन्याला सुरुवात होणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. आता दुसऱ्या दिवशी वरुणराजा विश्रांती घेऊन सामन्याची सुरुवात होऊन देणार की आजप्रमाणेच खेळ रद्द करावा लागणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या दिवशी टॉस किती वाजता होणार?

🚨 Update from Bengaluru 🚨

Day 1 of the 1st #INDvNZ Test has been called disconnected owed to rain.

Toss to instrumentality spot astatine 8:45 AM IST connected Day 2

Start of Play: 9:15 AM IST #TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RzmBvduPqr

— BCCI (@BCCI) October 16, 2024

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article