धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात:ट्रॅव्हल्सने दिली धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी

1 day ago 1
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारला भीषण अपघात झाला आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सोरतापवाडी या ठिकाणी ट्रॅव्हल्सने राजश्री मुंडे यांच्या कारला धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवास करत होत्या. त्या बीडहून मुंबईकडे जात असताना त्यांची कार सोरतापवाडी या ठिकाणी आल्यानंतर एका खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, राजश्री मुंडेंच्या कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. राजश्री मुंडे किरकोळ जखमी या अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांसह आसपासच्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. हेही वाचा... परळी विधानसभा मतदारसंघात यंदा 30 हजार नवमतदार बजावणार हक्क:प्रशासनाची तयारी पूर्ण, पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहितेच्या दुसऱ्याच दिवसी परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी बुधवार (16 ऑक्टोबर) रोजी पत्रकार परिषद घेवून िनवडणूकीची पुर्ण झाल्याची माहिती दिली. विशेषत: परळी मतदारसंघात प्रशासनाकडून नविन मतदारनोंदणीसाठी हाती घेतलेल्या मोहिमेस प्रतिसाद मिळाला असून लोकसभेपेक्षा 9 हजार तर गत विधानसभा निवडणूकीतील मतदार संख्येपेक्षा 30 हजार नविन मतदारांची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत परळी विधानसभा निवडणूकीत एकुण 3 लाख 35 हजार 954 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article