नवीन बसस्थानकासह टॉवर चौक मार्गावरील अतिक्रमण मनपाने हटवले:शहरातील हातगाड्या, ठेल्यांवर महापालिका प्रशासनाने केली धडक कारवाई‎

2 hours ago 2
मनपा आयुक्‍त, प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्‍या आदेशान्‍वये अकोला मनपा क्षेत्रातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई शनिवारी केली . त्यात गांधी चौक येथील चौपाटी, ओपन थिएटर ते फतेह अली चौक, बसस्‍थानक ते टॉवर चौक, टॉवर चौक ते अशोक वाटिका रोड, गांधी चौक ते ताजनापेठ पोलिस स्‍टेशन, ओपन थिएटर चौक ते सिटी कोतवाली चौक पर्यंतच्‍या रस्‍त्‍यावरील अतिक्रमणांचा समावेश आहे. बस स्‍थानकाच्‍या आवार भिंतीला लागून असलेल्‍या हात गाड्या ठेले तोडण्‍यात आल्‍या. या वेळी सहायक नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, जीवन मानकीकर, रफीक अहमद, स्‍वप्‍नील शिंदखेळकर, स्‍वप्‍नील पवार, सोनु गायकवाड, मनीष भोंबळे, योंगेश कंचनपुरे, धीरज पवार आदींची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article