नांदेड लोकसभा पोटनिवडणूक:काँग्रेसची दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी; BJP चे अद्याप ठरेना

1 day ago 1
काँग्रेसने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने येथून आपले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार या ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जवळपास 84 जागांवर चर्चा झाली. त्यापैकी 62 जागांवर बैठकीत एकमत झाले. या बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी यासंबंधीचा निर्णय जाहीर करण्यात आला. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article