नागपूरमध्ये भीषण अपघात:अनियंत्रित ऑटो क्रेनला धडकल्याने दोन महिला ठार
2 hours ago
1
कामठी रोडवर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोन महिला आणि एका तरुणाचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. खैरीजवळ अनियंत्रित ऑटो क्रेनला धडकल्याने दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला, तर ऑटोचालकासह सहा जण गंभीर जखमी झाले. निर्मलाबाई लक्ष्मण जुमडे (५०, तांडापेठ) कौशल्या कुहीकर (६०) असे मृतक महिलांचे नाव आहे. तर सतीश गोमकाळे हा ऑटोचालक तसेच प्रवासी दुर्गा नरेंद्र वैरागडे (६०, तांडापेठ), बेबीबाई मोतीराम आसोले (६०, तांडापेठ), इंदुमती भैसारे (६०, तांडापेठ), विमल गोपाळ ढाणे (६०, तांडापेठ), रेखा पराते (६०, चंद्रभागा नगर) हे जखमी झाले आहेत. मृत व जखमी प्रवासी कॅटरिंगच्या कामासाठी कामठी येथे जात होत्या. दुपारी साडेतीन वाजता एमएच ४९, सीएफ १२५० या सतीश गोमकाळेच्या ऑटोने त्या जात होत्या. खैरी येथील महिंद्रा शोरूमसमोर सतीशचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी क्रेन रस्त्याच्या कडेला उभी होती. ऑटो त्या क्रेनला धडकला. ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. क्रेनला धडकल्यानंतर ऑटो उलटला. सर्व महिला गंभीर जखमी झाल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. जुनी कामठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे निर्मलाबाई व कौशल्या यांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातामुळे कामठी रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात ऑटोचालक खुलेआम क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करताना दिसून येतात, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)