निवडणुकीआधीच मविआमध्ये धुसफूस:समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची नाराजी, जागावाटप लवकर करण्याची केली मागणी

1 day ago 2
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय झाला नाही. जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील मित्रपक्ष समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी नाराज आहेत. आझमी यांनी महाविकास आघाडीवरील आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. आम्ही महाविकास आघाडीत सहभागी आहोत तर आम्हाला विश्वासात घेऊन लवकरात लवकर जागावाटवाचा निर्णय घेण्यात यावा. काँग्रेस काही उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे मी बातम्यांमध्ये ऐकले. काँग्रेस जाहीर करणाऱ्या जागांमध्ये आम्ही मागितलेल्या जागा असल्यास आमचे कार्यकर्ते नाराज होतील, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. अबू आझमी म्हणाले, महाविकास आघाडीत आम्ही सहभागी आहोत तर आम्हाला बोलावून जागावाटपाचा निर्णय जाहीर करावा. काँग्रेस पक्ष काही जागांची घोषणा करणार असल्याचे बातम्यांमध्ये ऐकले. आम्ही मागणी केलेल्या जागा त्यात असल्या तर आघाडी तुटली अस गैरसमज आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरेल. त्यामुळे आम्हाला विश्वासात घेऊन जागांची घोषणा करावी, अशी मागणी अबू आझमी यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. महाविकास आघाडीसोबत झालेल्या एका बैठकीत आम्ही 12 जागांची मागणी केली होती. त्या 12 जागांवर कोणीही विरोध दर्शवला नाही. ...तर ती माझी चूक ठरेल अबू आझमी पुढे म्हणाले, त्या पूर्ण 12 जागा आम्हाला द्याव्यात, असेही आम्ही म्हणत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या जागांवर मी दावा केला तर ती माझी चूक ठरेल. पण ज्याा जागांवर त्यांची ताकद नाही, जिथे ते निवडून येत नाही, अशा जागांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कार्यकर्ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे जागावाटपावर लवकर तोडगा काढावा, असेही अबू आझमी म्हणाले. समाजवादी पक्षाला आम्ही जागा सोडणार - वडेट्टीवार अबू आझमी यांच्या मागणीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समजावादी पक्षासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी काही जागा सांगितल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. आज आमचे जागा वाटप पूर्ण झाले की त्यांच्या त्यांच्या कोट्यातून जागा वाटपाची पूर्ण तयारी आहे. 216 जागावर चर्चा झाली आहे. 66 मतदारसंघावर आमची आज चर्चा सुरू आहे. छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले जात नाही. मुंबईतील जागा वाटपावर आमची चर्चा झाली आहे. त्यांत समाजवादी पक्षालादेखील आम्ही जागा सोडणार आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article