इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने दाखल केलेले युद्ध आणि मानवताविरोधी गुन्हे तसेच काढलेले अटक वॉरंट याला अमेरिकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तर ब्रिटन, कॅनडा, नेदरलँड आणि इटली या देशांनी मात्र, जर नेतन्याहूंनी त्यांच्या देशात पाय ठेवला तर त्यांना तत्काळ अटक करण्यात येईल असे म्हटले आहे. अमेरिकेने आयसीसीचे आदेश मानन्यास नकार दिला आहे. न्ययायालयाने घेतलेल्या निर्णयावर व्हाइट हाऊसच्या प्रवक्ता कॅरीन जीन पियरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा निर्णय घाईगडबडीत घेण्यात आला असून अमेरिका आयसीसीचा सदस्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या नियमांचे इटली पालन करेल असे इटलीचे संरक्षणमंत्री गुइडो क्रोसिटो यांनी म्हटले आहे.
हमास आणि इस्रायल एकसारखे आहेत या आयसीसीच्या आरोपांचा मात्र आपण इन्कार करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही नियमांशी बांधील आहोत त्यामुळे नेतन्याहू इटलीला आले तर त्यांना अटक केली जाईल असेही ते म्हणाले. ब्रिटननेही इटलीचे समर्थन केले असून नेतन्याहू आणि हमास यांच्यात नैतिक समानता नसल्याचे म्हटले आहे.