परळ-भोईवाडा येथील स्नेहल क्रीडा मंडळाचा 49 वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त जरीचा फेटा, महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडेल असा पेहराव करून शेकडो स्त्री- पुरुषांनी फटाक्यांची आतषबाजी करत विभागात जणू दिवाळीच साजरी केली. नुकतीच मंडळातर्फे कराओके स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रिया बेर्डे, दीक्षा हरयान आणि तेजल कदम यांनी पारितोषिक पटकावले.
स्नेहल क्रीडा मंडळाने सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रांत काम केले आहे. 1 फेब्रुवारी 1976 साली क्रीडा मंडळ म्हणून स्थापना केल्यानंतर लगेचच 15 जून 1976 गिरणी कामगार व झोपडपट्टीतील मुलांसाठी मोफत शिकवणी वर्ग चालवले. मुलांना वक्तृत्व, गायन स्पर्धेसाठीचे मार्गदर्शन केले. 1985 मध्ये कला विभाग सुरू करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्याचे प्रशिक्षण दिले. आज तिसऱ्या पिढीतील विद्यार्थी या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. मनोहर खापरे, शरद फाटक, प्रदीप खताते हे पहिल्या फळीचे कार्यकर्ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी मोफत गडकिल्ले ओळख व भ्रमंती, वयोवृद्धांसाठी महाकीर्तन महोत्सव, वृद्धाश्रमात मदत, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम मंडळ राबवत आहे. मंडळाने नुकतीच कराओके स्पर्धा घेतली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर झुजम, शैलेश खापरे, मनोहर खापरे, प्रदीप खताते, अमोल धुरी, पंकज चव्हाण, शरद फाटक, नितेश कदम, नमिता पंदेरे, स्नेहा बाणे, स्नेहल साळवी, सानिका खापरे यांचा सहभाग होता.