पराभवानंतर शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया:म्हणाले - आमदारकीपेक्षा मोठे काहीतरी घेऊन येतो, खचायला मी काय भिताड किंवा पूल आहे का?
2 hours ago
2
निवडणुकीत पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावातील शेतात पाणी नाही आले, तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. ते सांगोला येथे आयोजित चिंतन बैठकीत बोलत होते. पराभवाने खचू नका...माझ्यावर विश्वास ठेवा, या आमदारकी पेक्षा मोठे कायतर घेऊन येऊन दाखवतो, असेही शहाजी बापू पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीत शहाजी बापू पाटील हे देखील होते. त्यांचे गुवाहाटीतील काय झाडी, काय डोंगर, हा डायलॉग गाजला होता. शहाजी बापू यांनी विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर शहाजी बापू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. मुंबईतून आल्यानंतर त्यांनी सांगोला येथे कार्यकर्त्यांसोबत आत्मचिंतन बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत विरोधकांवार हल्लाबोल केला. काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
पराभव काय पहिल्यांदा होत आहे का? पराभवामुळे खचायला मी काय भिताड किंवा पूल आहे का? असे म्हणत उद्धव ठाकरे आणि भोंगा संजय राऊत येथे त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडायला आले होते, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. मी भाषणात महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार म्हणून सांगत होतो आणि संजय राऊत आम्ही सत्तेत येणार अशी बडबड करीत होते. संजय राऊत कुणाकुणाला तुरुंगात टाकायचे याची यादी करून वाट बघत होते. तू तुरुंगात जाऊन आला म्हणून सगळा महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे म्हणतोय, असा हल्लाबोल शहाजी बापू पाटील यांनी केला. आमदारकीपेक्षा मोठे काहीतरी घेऊन येणार
ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती. चुकीच्या पद्धतीने प्रचार केल्याने आपला पराभव झाल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले. दोन वर्षात 5 हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केले, हे सांगोला तालुक्याला माहित आहे. असेही ते म्हणाले. शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून आमदारकी पेक्षा मोठे काहीतरी घेऊन येऊन दाखवतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील स्थानिक स्वराज संस्थेत गुलाल आपल्यालाच घ्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. गुवाहटीला गेलेले पाच आमदार पराभूत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे पक्षाचे गुवाहाटीला गेलेले पाच आमदार पराभूत झाले आहेत. पराभूत आमदारांमध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चौगुले यांचा समावेश आहे. माहीममध्ये सदा सरवणकर यांचा तिरंगी लढतीत पराभव झाला. शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाकडून पराभव स्वीकारावा लागला. भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या. बुलढाण्यातून संजय रायमूलकर यांचा पराभव झाला. उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)