परिचारकांची बी टीम पवारांच्या भेटीला:मंगळवेढ्यात परिचारक आणि भालके एका मंचावर

2 hours ago 2
शनिवारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची बी टीम समजले जाणारे अत्यंत विश्वासू नेते बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस एस पी गटाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तर इकडे मंगळवेढा येथे प्रशांत परिचारक आणि पवारांचे संभाव्य उमेदवार भगीरथ भालके एकाच मंचावर होते. या दोन्ही राजकीय घटनांमुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे राजकारण उत्कठावर्धक स्थितीत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी वेगवान झालेल्या आहेत. पडद्या आड आणि समोर ही रोज काही ना काही घटना घडत आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपुरात भेट झाली, बंदद्वार चर्चाही झाली. तर शनिवारी सुभाष भोसले यांच्यासह परिचारक यांचे निष्ठावान, विश्वासू आणि परिचारक गटाच्या कोअर कमिटी चे सदस्य माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, रा. पां कटेकर, संजय अभ्यंकर , संदीप मांडवे हे बारामतीत खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. सोलापूरचे नेते धर्मराज कडादी, महेश कोठे असे दिग्गज वेटींगवर असताना पवारांनी परिचारक समर्थक नेत्यांना अर्धा तास वेळ दिला आणि मतदार संघातील बारीक सारीक घटनांची माहिती घेतली. संभाव्य उमेदवारांची नावे विचारून घेतली. परिचारक समर्थक जेव्हा बारामतीत पवारांच्या सोबत चर्चा करीत होते तेव्हा मंगळवेढा येथे प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके एकाच मंचावर होते. विशेष म्हणजे यावेळी भालके आणि परिचारक अगदी खुर्चीला खुर्ची लावून जवळ बसले होते. यावेळी परिचारक यांचा सत्कार करण्यात आला. उर्वरित पान २

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article