पश्चिम बंगालच्या संस्थेला एक कोटींचा गंडा:लोखंड व्यवसायिकाविरोधात गुन्हा दाखल

6 days ago 4
लोखंड व्यावसायिकाने पश्चिम बंगालमधील एका संस्थेला एक कोटी सोळा लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली. बंगाल येथे हास्टेल व शाळेच्या बांधकामासाठी लोखंडाची आवश्यकता होती. यात घेतलेल्या रकमेपेक्षा कमी माल पाठवत बंगालच्या संस्थेची फसवणूक करण्यात आली आहे. यात जीशन इन्फ्राबिल्ड एएलएलचा मालक गणेश सराफ यांच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात श्री अकॅडमीचे सदस्य नरेश रामनिवास अग्रवाल (५६, रा. सिलीगुडी बाजार, दार्जीलिंग, पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, शाळा व हॉस्टेलच्या बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडासाठी लवकर माल मिळेल अशा ठिकाणाचा फिर्यादी शोध घेत होते. त्यावेळी त्यांना नागपूर मधील एका उद्योजकांकडून शहरातील गणेश सराफ यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावर सराफ यांनी प्रत्यक्ष साईट बघूनच यावर निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी फीस व येण्या-जाण्याचा खर्च करण्याची बोली करून घेतली. त्यासाठी आगाऊ अडीच लाख रक्कम जमा करून घेतली. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लागणारा ३३० टन माल पाठवण्याची तयारी दर्शवली. फेब्रुवारीमध्ये दीड कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यानंतर एक ट्रक माल घेऊन बंगालमध्ये पोहचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार व माल येणे सुरु राहिले. जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत ५ कोटी २७ लाख रुपये घेण्यात आले. प्रत्यक्षात बंगाल येथे केवळ ४ कोटी ११ लाख ६३ हजारांचा माल पोहचला. त्यामूळे १ कोटी १६ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपासासाठी गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article