पश्चिम बंगालमधील संस्थेला लोखंड विक्रीत 1 कोटीचा गंडा:जास्त रक्कम घेऊन पाठवला कमी माल, विक्रेत्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा

6 days ago 3
लोखंड व्यावसायिकाने पश्चिम बंगालमधील एका संस्थेला एक कोटी १६ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली. बंगाल येथे होस्टेल व शाळेच्या बांधकामासाठी लोखंडाची आवश्यकता होती. यात घेतलेल्या रकमेपेक्षा कमी माल पाठवून संस्थेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जिशन इन्फ्राबिल्ड एएलएलचा मालक गणेश सराफ यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात श्री श्री अकॅडमीचे सदस्य नरेश रामनिवास अग्रवाल (५६, रा. सिलिगुडी बाजार, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शाळा व होस्टेलच्या बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडासाठी लवकर माल मिळेल अशा ठिकाणाचा ते शोध घेत होते. त्या वेळी त्यांना नागपूरमधील एका उद्योजकांच्या माध्यमातून शहरातील गणेश सराफ यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यावर सराफ यांनी प्रत्यक्ष साइट बघूनच यावर निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी शुल्क व येण्या-जाण्याचा खर्च करण्याची बोली करून घेतली. त्यासाठी आगाऊ अडीच लाख रुपये जमा करून घेतले. तपास ‘आर्थिक गुन्हे’कडे जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लागणारा ३३० टन माल पाठवण्याची तयारी दर्शवली. फेब्रुवारीमध्ये दीड कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यानंतर एक ट्रक माल घेऊन बंगालमध्ये पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार व माल येणे सुरू राहिले. जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत ५ कोटी २७ लाख रुपये घेण्यात आले. प्रत्यक्षात बंगाल येथे केवळ ४ कोटी ११ लाख ६३ हजारांचा माल पोहोचला. त्यामुळे १ कोटी १६ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article