विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कतीने राज्यात सर्वाधिक 7 कोटी 63 लाख 34 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे 25 टक्के जप्तीची कारवाई एकटय़ा पुणे जिह्यात झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 15 ऑक्टोबरपासून पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघात एक पथक तैनात करण्यात आले होते. या पथकांनी केलेल्या कारवाईत 1 हजार 100 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1 हजार 42 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 234 वाहनांसह 7 कोटी 63 लाख 34 हजार 231 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्के, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क पुणेचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या नेतृत्काखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकांकडून जिह्यातील सर्क हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नोंदविण्यात आलेल्या गुह्यांत बिअर, देशी दारू, विदेशी दारू, अवैद्य गावठी हातभट्टी दारू, गाकठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायन, ताडी आणि सुमारे 234 काहने असा एकूण 7 कोटी 63 लाख 34 हजार 231 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिकसे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, उद्या (दि. 23) विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांचे अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.