फॉर्म 17-सी, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या, काँग्रेसचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

4 hours ago 1

मतदान दिनीचा फॉर्म 17-सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-57) व अंतिम निकाल पडताळणी (फॉर्म-20) यांची प्रत उमेदवारांच्या प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱयांना द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांना दिले आहे.

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीअन्वये मतमोजणी टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी झाल्यावर फॉर्म 17-सी मोजणी प्रतिनिधीची सही घेऊन मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देतो. त्याअगोदर त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी किंवा उमेदवार प्रतिनिधी यांना त्वरित देण्यात यावी. तसेच फेरीनिहाय तक्ता हा फॉर्म 17-सी भाग 2 वरून सहायक निवडणूक अधिकारी तयार करतो. त्या परिशिष्ट 57 च्या तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. फॉर्म 20 मध्ये मतमोजणी काटेकोरपणे झाली आहे की नाही? हे उमेदवार प्रतिनिधीला फार्म 17-सी भाग 2 तसेच फेरीनिहाय तक्त्यावरून कळू शकते. या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही पत्रात म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article