Published on
:
17 Nov 2024, 11:22 am
Updated on
:
17 Nov 2024, 11:22 am
पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट बोलत होते, रविवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पायलट म्हणाले, लोकसभेत इथली जनता महविकास आघाडीच्या मागे उभा राहिली. त्यामुळे राज्यात भाजपचा आकडा घटला. डबल इंजिन सरकार म्हणत आहे. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे, मात्र, आम्ही पढोगे तो आगे बढोगे, अशी घोषणा देतो आहोत. पाकिस्तान, हिंदुस्थान, मुसलमान, मंदिर, मस्जिद हे मुद्दे समोर आणले जात आहेत. भाजपने नोटबंदी केली. यामुळे देशात ऐतिहासिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे.
ते पुढे म्हणाले, आम्हाला राज्यात पसंती मिळत आहे. लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या लोकांनी त्यांनी केलेली कामे लोकांसमोर मांडावीत. आज भाजप पूर्णपणे उघड झाली आहे. १४७ खासदारांना निलंबित केले. भाजप फक्त सत्तेसाठी राजकारण करत आहे. एक हे तो सेफ हे. या अशा घोषणांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते आहे. महिलांना मदत, रोजगार, कृषी या विषयावर भाष्य करत नाहीत. ४५० चा गॅस साडे अकराशे रुपयांना झाला. तुमच्या दीड हजार रुपयांत काय होणार आहे? जनता याला बळी पडणार नाही. आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. अनेक जागेवर भाजपने बंडखोर उभे केले आहेत. राज्यात स्पष्ट बहुमताने आमचे सरकार येईल. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत. अयोध्येत भाजप हरली. इलेक्टराल बाँड गैर असल्याचे सांगितल्यानंतर भाजपने पैसे वापस द्यायला हवे होते.
हेलिकॉप्टर चेकिंग करण्यापेक्षा ॲम्ब्युलन्स, पोलिस वाहने तपासा. त्याचा वापर सरकार करू शकते. शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. मग भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करतील का, असे भाजपने घोषित करावे. अनेकजण इच्छा बाळगून आहेत.मात्र, आमचेच सरकार येईल. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या क्षमा मोहम्मद, काँग्रेसचे नेते अभय छाजेड व अन्य काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.