बाबा, तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन…; राष्ट्रवादीत प्रवेश करताच अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

2 hours ago 1

माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.

पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार.. #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार यांनी #महाराष्ट्र_प्रदेश_नॅशनॅलिस्ट_महिला_काँग्रेस_पार्टी_-_शरदचंद्र_पवार_पार्टीच्या #उपाध्यक्ष_पदी_नियुक्ती_केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे.

मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.

#ashvini_mahandage

#राजकारणातून_घडेल_समाजकार्य

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article