उत्तर प्रदेशातील बदोही येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बायको प्रियकरासोबत पळून गेल्याने धक्का बसलेल्या नवऱ्याने आपल्या 14 महिन्यांच्या जुळ्या मुलांची हत्या करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार 21 नोव्हेंबर रोजी पोलिसांत दिली होती. मात्र ती परतलीच नाही.
चमन सिंग चावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभाग अधिकारी ओराई यांनी सोमवारी सांगितले की, ओम प्रकाश यादव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ओम यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले होते. घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि फॉरेन्सिक टिम पोहोचल्यानंतर तिथे त्यांना आशी आणि प्रियांशी या 14 महिन्यांच्या जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले. तपास केला असता यादवने आत्महत्येपूर्वी जुळ्या मुलांच्या दुधात विषारी औषध मिक्स करुन पाजले होते अशी माहिती चमन सिंग चावडा यांना चौकशीत आढळली.