Sanjay Raut connected CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत शिंदेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसंच फडणवीसांवरही निशाणा साधलाय. वाचा सविस्तर...
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचा उल्लेख करत राऊतांनी शिदेंवर निशाणा साधला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलले होते, की मी दिल्लीची लाचारी करणार नाही आणि दिल्लीचे बूट चाटणार नाही. कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवीन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक दिल्लीचे बूट चाटतात. दिल्लीचे मुजरेगिरी करत आहेत. हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला आहे, असं संजट राऊत म्हणालेत.
बाळासाहेब ठाकरेंची आठवण
बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. हे निवडणूक आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने नावाने लढत आहोत. कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. महाराष्ट्राचा आरक्षण मुंबईचा रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हे सगळं गेलं अडीच वर्षात संकटात आहे. महाराष्ट्रावर गुजरातने ज्याप्रकारे आक्रमक केलं आणि आमचे राज्यकर्ते सध्याचे किंवा त्यांच्या कुटुंबातील काही लोक गुजरातची लाचारी करत आहेत. गुजरातच्या नवनिर्माण लागले दिल्ली प्राचार्य करत आहेत. हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हता किंवा नाही बाळासाहेबांनी आम्हाला ताट पाठीचा काना दिला. बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवला एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण स्वतःला विकू नको या सगळ्याचे आज आम्हाला आठवण येतेय, असं राऊत म्हणालेत.