आणखी एका AAP नेत्याला मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूरPudhari Photo
Published on
:
18 Oct 2024, 11:09 am
Updated on
:
18 Oct 2024, 11:09 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: आम आदमी पार्टीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जैन यांच्या जामीन अर्जाला दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मे 2022 मध्ये अटक करण्यात आली होती, असे वृत्त 'PTI' ने दिले आहे.