भाजप गृह मंत्रालयासह 3 महत्त्वाचे खाते स्वत:कडे ठेवणार:राष्ट्रवादी- शिवसेनेला कोणते खाते मिळणार?

2 hours ago 2
राज्यात महायुतीचे सरकार येणार अन् भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता फिक्स झाले आहे. यातच आता भाजप अर्थ, गृह, आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची 3 खाती आपल्याकडे ठेवणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. तर भाजपचे 132 आमदार निवडून आले आहे. यातच काही अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजप राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारी ही 3 मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादांकडे अर्थखाते 2023 मध्ये महायुतीच्या कार्यकाळात अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालसय देण्यात आले होते. पण महायुती विशेष: भाजपच्या आमदारांनी अजित पवार निधी देत नाही असे म्हणत अनेक आमदार नाराज झाले होते.. यामुळे आता मुख्यमंत्रीपदासह भाजप अर्थ, गृह, आणि सामान्य प्रशासन मंत्रालय आपल्याकडे ठेवणार असल्याचे समजत आहे. यात मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रीपद ही जाण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात येऊ शकते. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात येऊ शकते. यापूर्वीही गृहमंत्रीपद फडणवीसांकडे देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळीदेखील त्यांनी गृहमंत्रीपद स्वत:कडे ठेवले होते. तर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत त्यांनी गृहमंत्रीपद पुन्हा एकदा आपल्याकडे घेतले. महायुतीचे नेते शहांच्या भेटीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज अमित शहांची भेट घेणार आहेत. दिवसभरात अमित शहा एका कार्यक्रमासाठी मसुरीमध्ये असल्याने ही बैठक रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे. यामुळे आता महाराष्ट्रात नवे मुख्यमंत्र्यांचे नाव कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article