भाजपचं ठरलं… उद्या पहिली यादी जाहीर होणार; RSS कडून या नावांसाठी आग्रह

1 hour ago 1

BJP First Candidates List : भाजपचं ठरलं... उद्या पहिली यादी जाहीर होणार; RSS कडून या नावांसाठी आग्रह

भाजपचं ठरलं... उद्या पहिली यादी जाहीर होणार; RSS कडून या नावांसाठी आग्रह

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook

| Updated on: Oct 17, 2024 | 9:58 AM

उमेदवारांची नावे जाहीर करण्यात महायुती आघाडीवर आहे. महाविकास आघाडीची यादी लांबणीवर पडणार आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीची पहिली यादी 20 तारखे नंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बैठकांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांची याद्याही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. महाविकास आघाडीतील यादी मात्र पुढच्या आठवड्यातच जाहीर होणार आहे.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article