भारतीय नौदलाने आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’वरून ३,५०० किमी K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. (File Photo)
Published on
:
28 Nov 2024, 6:48 am
Updated on
:
28 Nov 2024, 6:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाने आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’वरून ३,५०० किमी K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ काल ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती संरक्षण सुत्रांनी दिली आहे. ‘आयएनएस अरिघात’ ही देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ऑगस्टमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या 'INS Arighaat'वरून घेण्यात आलेली K-4 क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी आहे. K-4 ची गेल्या अनेक वर्षांत आतापर्यंत केवळ सबमर्सिबल पोंटून्समधून चाचणी घेण्यात आली होती.