"मंगळवेढे भूमी संतांची' संत विचारांचे धन:साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांचे प्रतिपादन, पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन

6 days ago 3
मंगळवेढ्याला संत साहित्याची मोठी परंपरा असून, वारी परिवारनिर्मित व इंद्रजित घुले लिखित मंगळवेढे भूमी संतांची पुस्तक म्हणजे संत विचारांचे धन आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढा नगरपरिषदेच्या सभागृहात वारी परिवारच्या वतीने आयोजित केलेल्या मंगळवेढे भूमी संतांची या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून स्वर्गीय रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी डॉ. इंगोले म्हणाले, मंगळवेढानगरी ज्वारीच्या कोठाराबरोबरच संत विचारांच्या धनाचे कोठार आहे. माणसाच्या मनाचा विकास हा संत साहित्यातून होत असतो. महानुभाव, वारकरी, दत्त, रामदासी संप्रदायातून महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे. त्यातील वारकरी संप्रदाय म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारा संप्रदाय आहे. चोरी करू नये, नेहमी सत्य बोलावे, परस्त्री मातेसमान मानावी, असे मौलिक विचार वारकरी संप्रदायाने दिलेले आहेत. भक्त होण्याची पहिली पायरी म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. मंगळवेढ्यातील संतांचा महिमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वारी परिवार प्रयत्न करत आहे. हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. या वेळी मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, मंगळवेढ्यातील विविध संत मंदिरांचे अध्यक्ष, उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सेवेकरी मानकरी यांच्यासह विष्णुपंत आवताडे, जयराज शेंबडे, यादव आवळेकर, अशोकराव कोळी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article