मंगळवेढ्यात आज नवरात्रोत्सव मिरवणूक:जय शिवराय मंडळाने साकारला हरिहरेश्वर देखावा

6 days ago 4
नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी देवी मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील विविध मंडळांच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुका रात्री उशिरा संपतील. दसऱ्याच्या पूजेने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. गेल्या ३० वर्षांपासून मंगळवेढा शहरातील नवरात्र उत्सवात हिरीरीने सहभागी होणाऱ्या जय शिवराय नवरात्र महोत्सव मंडळ जगदाळे गल्ली याने यावर्षी नवरात्रोत्सवात सहभाग घेत धार्मिक परंपरा जपली आहे. यावर्षी मंडळाने अहमदनगर येथील हरिश्चंद्रगड किल्ल्यावर असणाऱ्या शिवमंदिरातील केदारेश्वर गुहा हा देखावा उभा केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. हा देखावा उभा करण्यासाठी थर्माकोल, प्लायवूड, कापड, पाणी इत्यादीचा वापर केला. कोल्हापूर येथील कलाकाराने सर्व साहित्य आणून हा देखावा केला आहे. शहरातील १० दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा देखावा साकारला आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्ष राजेंद्र पडवळे, नवनाथ यादव, सागर पडवळे, अमर ताड यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. देखावा उभारण्यासाठी १ लाख ४५ हजार रुपये खर्च आला आहे. धार्मिक व पारंपरिक देखावे उभ्या करण्याकडे आमच्या मंडळाचा कल असतो गतवर्षी चारधामचा देखावा उभा केला होता. दरवर्षी वेळेत मंडळाची मिरवणूक पूर्ण करण्यात येते, असे नवरात्र मंडळाचे अध्यक्ष रमेश फडतरे यांनी सांगितले. भाविकांना मोफत मसाला दूध, शेंगदाणा लाडू वाटप मैत्री बचत गट व मित्र मंडळाच्या वतीने चोखामेळा चौक येथे दहा वर्षांपासून भाविकांना चोखामेळा चौकात मसाला दूध व शेंगदाण्याचे लाडू वाटप करण्यात येतात. या दूध वाटपाचे स्टॉलचे उद्घाटन डॉ. नितीन आसबे यांच्या हस्ते केले. प्रमुख उपस्थिती रमेश राजमाने ,सचिन बडोदकर , अक्ररम मुजावर ,नवनाथ पडवळे आदींची होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article