Published on
:
17 Nov 2024, 9:39 am
Updated on
:
17 Nov 2024, 9:39 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मंत्री आणि आप नेते कैलास गहलोत यांनी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहित ही माहिती दिली आहे. यावर आम आदमी पक्षाने (AAP) पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
गेहलोत यांचा राजीनामा 'BJP'चे घाणेरडे राजकारण
आप नेते संजय सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "कैलाश गेहलोत यांचा राजीनामा हा भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचा आणि कटाचा भाग आहे. ED-CBI छापे टाकून कैलाश गेहलोत यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला होता आणि आता ते भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलत असल्याची टीका त्यांनी केली आहे".
मोदी वॉशिंग मशीन सक्रिय; संजय सिंह
पुढे ते म्हणाले, "दिल्ली निवडणुकीपूर्वी मोदी वॉशिंग मशीन सक्रिय झाले आहेत. आता या मशीनच्या माध्यमातून अनेक नेत्यांचा भाजपमध्ये समावेश होणार आहे", असे देखील संजय सिंह यांनी म्हटले आहे.
भाजपच्या माजी आमदाराचा AAP मध्ये प्रवेश
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षात फेरबदल होत आहेत. मंत्री कैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या एका नेत्याने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अनिल झा असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, ऋतुराज झा यांना किरारीतून तिकीट नाकारले जाईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अनिल झा याआधी दोनदा आमदार झाले आहेत. किरारीतून ते आमदार राहिले आहेत.