शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांची 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्राणज्योत मालवली होती. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण राज्यासह देशात होता. त्यामुळे त्यांच्या अत्यंविधीला कोट्यवधी नागरीक मुंबईत आले होते. तसेच घड्याळाच्या काट्यांवर चालणारी मुंबई तीन दिवस अक्षरश: स्तब्ध झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं जाण्याचं दु:ख आजही हजारो शिवसैनिकांना टोचत असतं. बाळासाहेब असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या कदाचित घडल्या नसत्या, अशा भावना अनेक शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतृीदिनी अनेक दिग्गज नेत्यांकडून त्यांना अभिवादन केलं जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. तसेच आपले विचार हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि नातू आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांचं ट्विट नेमकं काय?
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. “माझे विचार उद्धवजी आणि आदित्यजी यांच्यासह संपूर्ण शिवसेनेसोबत आहेत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटने भाजपला देखील उत्तर मिळाल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अनेक वर्ष राजकीय मतभेद होते. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात होते. तर भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलली आणि शिवसेना-काँग्रेसची मैत्री झाली. ही मैत्री आजही अबाधित आहे.
हे सुद्धा वाचा
Remembering Balasaheb Thackeray ji connected his 12th decease anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the full Shiv Sena family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसवर आरोप केला जातो की, काँग्रेसकडून कधीच बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती केली जात नाही. पण राहुल गांधी यांचं आजचं ट्विट हे नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर असल्याचं बोललं जात आहे. अर्थात राहुल गांधी यांच्या ट्विटवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.