मविआची भूमिका सर्वसमावेशक, छोट्या पक्षांना जागा सोडणार:20 ऑक्टोबरला काँग्रेसची पहिली यादी अपेक्षित- विजय वडेट्टीवार

1 day ago 1
महाविकास आघाडीचे 216 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित जागांचे वाटप आज संपेल. 20 तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, 216 पैकी 84 जागा या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. 20 तारखेला संध्याकाळी पहिली यादी येण्याची अपेक्षा आहे आणि उर्वरित जागा आज वाटप झाल्यानंतर कदाचित 20 तारखेला अंतिम यादी देखील येऊ शकेल. आज जागेवर सर्व तोडगा निघाला उर्वरित 66 जागेवर आणि तो होईल आज बैठक त्यासाठीच आहे आणि कुठेही अडचण येणार नाही. जिंकण्याचा निर्धार केलेला आहे. आमची भूमिका सर्वसमावेशक विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमची भूमिका सर्वसमावेशक आहे. जागावाटपसाठी दिल्लीत जायची गरज नाही, आम्ही महाराष्ट्रातच जागावाटप फायनल करू. जागावाटपावर आम्ही आजच किंवा उद्या पत्रकार परिषद घेऊ. आमच्यासोबत असेलेल्या इतर पक्षांनाही काही जागा आम्ही देणार आहोत. छोट्या पक्षांनाही जागा देणार विजय वडेट्टीवार म्हणाले की, समजावादी पक्षासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी काही जागा सांगितल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आज आमचे जागा वाटप पूर्ण झाले की त्यांच्या त्यांच्या कोट्यातून जागा वाटपाची पूर्ण तयारी आहे. 216 जागावर चर्चा झाली आहे. 66 मतदारसंघावर आमची आज चर्चा सुरू आहे. छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले जात नाही. मुंबईतील जागा वाटपावर आमची चर्चा झाली आहे. त्यांत समाजवादी पक्षालादेखील आम्ही जागा सोडणार आहोत. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला तूर्तास दिल्लीतून ब्रेक महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा तिन्ही पक्षांमध्ये रंगली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असे दावे केले. तर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊतही दावे करत होते. मात्र आता काँग्रेस नेत्यांनी अशी जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशी तंबी दिल्लीतून देण्यात आल्यामुळे तूर्त हा विषय थांबलाय.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article