Published on
:
28 Nov 2024, 6:08 am
सीबीएसईनंतर आता आयसीएसई, आयएससी परीक्षेच्या वेळापत्रकाची वाट पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीईने भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आयसीएसई म्हणजे इयत्ता 10 वी आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट आय एससी म्हणजे बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट https:/// cisce. org वर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
सीआयएससीईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आयसीएसईच्या परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 27 मार्च 2025 पर्यंत चालतील. आयएससी बोर्डाच्या परीक्षा 13 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील आणि 5 एप्रिल 2025 रोजी संपतील. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की प्रश्नपत्रिकेत दिलेल्या वेळेव्यतिरिक्त उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त 15 मिनिटे मिळतील. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
आयसीएसईच्या वर्गासाठी इंग्रजी भाषेचा पेपर पहिल्या दिवशी म्हणजेच 18 फेब—ुवारी 2024 रोजी घेण्यात येईल. पर्यावरणशास्त्राचा पेपर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 27 मार्च 2025 रोजी होईल. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत परीक्षा होणार आहे, तर आयएससीची परीक्षा पर्यावरण विज्ञान या विषयाने सुरू होईल. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी कला शाखेसह इतर विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.