महापारेषणमधील 200 कोटींवरील प्रकल्प भांडवलदारांना देऊ नका:कृती समितीची मागणी, पारस येथील औष्णिक वीज केंद्राबाहेर केली निदर्शने

2 hours ago 2
महापारेषणमधील २०० कोटी रुपयेवरील प्रकल्प भांडवलदारांना देऊ नका, यासह प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीतर्फे पारस येथील औष्णिक वीज केंद्रच्या कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. या मागण्यांसाठी आंदोलनाचे टप्पे पाडण्यात आले असून, पुढील टप्प्यात २५ सप्टेंबर रोजी ४८ तासाच्या संपावर जाण्याचा इशाराही समितीने दिला आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या वीज कंपनीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. समांतर वीज वितरणाचा परवाना व वीज कंपन्यांचे विविध मार्गाने होणाऱ्या खासगीकरणाला विरोध करण्यात येत आहे. याबाबत कृती समितीने उर्जामंत्र्यांशी चर्चा केली होती. खासगीकरण न होण्याची ग्वाहीदेखील देण्यात आली. मात्र त्यानंतरही खासगीकरणाचा निर्णय घेण्यात येत असल्याचे समितीने म्हणणे आहे. या निर्णयाच्या विरोधात कृती समितीने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान कृती समितीने पारस येथे द्वारसभा घेत निदर्शने केली. याठिकाणी संतोष खुमकर , सतीश शेळके, अमोल भाकरे, कैलास खेडकर, नागेश मुंडे, सुनील मोरखडे, सुनील सरपाते आदींनी मार्गदर्शन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article