महायुतीला आमचे अस्तित्वच मान्य नव्हते:वापरा, फोडा अन् फेका हेच त्यांचे धोरण, भाजप लहान पक्षांना कधीही मोठे करत नाही - जानकर

2 hours ago 1
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रणित महायुतीवर गंभीर आरोप केलेत. महायुतीला आमचे अस्तित्वच मान्य नव्हते. त्यांना केवळ आमची मते हवी आहेत. आम्हाला वापरा, फोडा आणि फेकून द्या हेच त्यांचे धोरण होते, असे त्यांनी म्हटले आहे. धनगर नेते महादेव जानकर यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, महायुतीमध्ये आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. त्यांना आमचे अस्तित्वच मान्य नव्हते. जागावाटपाची चर्चा होत असताना त्यांनी आम्हाला बोलावण्याचेही सौजन्य दाखवले नाही. ही चर्चा केवळ भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्यांना केवळ आमची मते हवी होती. आम्हाला वापरा, फोडा व फेकून द्या असेच त्यांचे धोरण होते. आम्हाला महायुतीच्या जागावाटपात किमान 12 जागा हव्या होत्या. पण ते केवळ 3-4 जागांवर आमची बोळवण करणार होते. त्यामुळे आम्ही स्वतःहूनच महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासप किंगमेकरच्या भूमिकेत जाणार राष्ट्रीय समाज पक्ष आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवेल. आम्ही राज्यात अधिकाधिक उमेदवार उभे करू. सत्तेत येणे किंवा मंत्रीपद मिळवणे हे आमचे लक्ष नाही. अधिकाधिक मते मिळवणे हेच आमचे लक्ष आहे. यामुळे आमच्या पक्षाचे अस्तित्व यापुढेही कायम राहील. आम्हाला किंगमेकरच्या भूमिकेत जायचे आहे. निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे महादेव जानकर म्हणाले. भाजप लहान पक्षांना केव्हाच मोठे करत नाही महादेव जानकरांनी यावेळी महायुतीत छोट्या पक्षांपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा होत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडमुकीत आमच्या पक्षाचे नेते राहुल कुल हे पुण्यातील दौंड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी रासपला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. ते पुन्हा जिंकून आले. याचा अर्थ महायुतीत लहान पक्षांचे अस्तित्व राखणे अवघड आहे. भाजप केव्हाच लहान पक्षांना मोठे होण्यास मदत करत नाही. उलट आमच्यातील जिंकणाऱ्या उमेदवारांना ते स्वतःकडे घेऊन आमच्या पक्षाला अधिक कमकूवत करतात. हे ही वाचा... शरद पवार CM असताना दाऊद इब्राहिमला भेटले होते:प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप, दुबई एअरपोर्टवर भेट झाल्याचा दावा मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवताना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दुबई विमानतळावर भेट घेतली होती, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा आरोप केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर भाजप हरियाणासारखी महाराष्ट्रात बाजी मारणार?:शिंदेंच्या मराठा चेहऱ्यासह बसप, MIM चे एकेक मत महायुतीला लाभ पोहोचवणार मुंबई - हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप बॅकफूटवर राहून पराक्रम गाजवण्याचा विचार करत आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत हरियाणात फारसे यश मिळाले नाही. पण त्यानंतर विधानसभा निवडणूक येईपर्यंत भाजपने येथील हरलेली लढाई जिंकून दाखवली. महाराष्ट्रातही असेच काही घडू शकते. महाराष्ट्रातही भाजपप्रणीत महायुतीला लोकसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. आता हरियाणासारखा डाव टाकून भाजप महाराष्ट्रातही बाजी मारण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेवर काम करत असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article