मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची बिले अद्याप प्रलंबित:कंत्राटदारांची जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव‎

2 hours ago 2
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गावांमध्ये शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबवण्यात आलेली आहे. यामधून जिल्ह्यात ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यामधील काही ग्रामपंचायत कामे ही ९५ टक्के पूर्णत्वास आली आहे तर काही ग्रामपंचायती ८० टक्क्यांवर पूर्ण झालेली आहे. मात्र, शासनाच्या टक्केवारीनुसार देयकांची ३५ टक्के, ४० टक्के लॅटर हाईट, २५ टक्के स्लॅब लेव्हलपर्यंत बांधकाम झाले आहे. मात्र, आजवर त्याची रक्कम कंत्राटदारांना मिळालेली नाही. असा आरोप करीत कंत्राटदारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. तसेच तत्काळ बिल अदा करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटल्यानुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपुर, अजनगाव सुर्जी, दर्यापूर, धारणी या आठ तालुक्यामधील गावांमध्ये शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबवण्यात आलीे. परंतु, त्यामधील काही ग्रामपंचायत कामे ही ९० टक्यांच्या वरती गेली आहे. परंतु, शासनाच्या टक्केवारीतील परिपत्रकानुसार अजूनपर्यंत देयकांची रक्कम या कंत्राटदारांना मिळालेली नाही. त्यामुळे या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तत्काळ प्रलंबित देयके देण्यात यावी.आणि आमच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या कंत्राटदारांनी निवेदनातून केली आहे. यावेळी अनिल कणाटे, शेखर मस्के, मोहम्मद जमीर शेख, आदित्य गावंडे, राजेश मेटकर, अमित केंडे, कमलेश जयस्वाल, कपिल जयस्वाल, प्रमोद कलाने आदी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article