मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?:जितेंद्र आव्हाड म्हणाले - छोट्यातील छोट्या गोष्टींवर करडी नजर ठेवल्याने हे शक्य झाले
2 hours ago
1
एकीकडे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला, तर दुसरीकडे मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. यावर आपण कसे निवडून आलो, काय काळजी घेतली याबाबत आव्हाड यांनी फेसबुकवर पोस्ट करून सांगितले आहे. माझ्या टीमने गांभीर्याने लक्ष घालत पहिल्या दिवसापासून निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली, त्यामुळे हे शक्य झाल्याचे आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात ईव्हीएम मशिनची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली होती. यावेळी माझी एक टीम 25 सहकाऱ्यांसोबत पहिल्या दिवसापासून सज्ज झाली. त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती. माझ्या या टीमने यात पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली. ईव्हीएम मशीनबाबत पहिल्या टप्प्यातील तपासणी (FLC), रँडमायझेश 1-2 व नंतर कमिशनिंगची प्रक्रिया जी पार पाडली जाते, त्यावर या टीमने लक्ष ठेवले. निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला, चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या. अधिकाऱ्यांशी वाहीवेळा वादही झाला, गोड बोलुनही कामे करून घेण्यात आली. हे करण्यामागे आमचे सर्व गोष्टींवर लक्ष आहे याची जाणीव करून देण्याची रणनिती होती. ईव्हीएमच्या वाहतुकीवरही आम्ही लक्ष ठेवले होते. जेव्हा जेव्हा ही ईव्हीएम एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यात आली तेव्हा तेव्हा त्या गाड्यांमागे आमची टीम जात होती. एक गाडी पोलिस सुरक्षा न घेताच निघाली होती, त्याचे ट्विटही केले होते. निवडणूक आयोगाच्या सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडल्यामुळे कोणत्या बुथवर कोणती मशीन जाणार, याचे तपशील आमच्याकडे होते. ते तपशील आम्ही आमच्या पोलिंग एजंटना दिले. यामुळे आमच्या बुथवर इतर कोणत्या मशीन्स आणण्याची हिंमत होऊ शकली नाही. मतमोजणी वेळी देखील आमच्या एजंटना याची माहिती दिली गेली. त्यांचे प्रशिक्षण घेतले. ईव्हीएम संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवले. यामुळे कोणताही धांदली माझ्या मतदारसंघात होऊ शकली नाही आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. आव्हाडांचा 96 हजार 228 मतांनी विजय
जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा मतदारसंघातून 96 हजार 228 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. आव्हाड यांना 1 लाख 57 हजार 141 मते मिळाली. तर नजीब मुल्ला यांनी 60 हजार 913 मते घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गड ढासाळत असताना जितेंद्र आव्हाड यांनी आपला गड कायम राखला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)