शहरातील जिंतूर रोडवर पोती पडली ट्रक मधून खाली
परभणी (Government grain) : परभणी शहरातून धान्याची वाहतुक करणार्या एका ट्रक मधून जवळपास वीस गव्हाची पोती खाली पडली. मर्यादेपेक्षा जास्त पोती भरुन हा ट्रक वाहतुक करत होता. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. ट्रकच्या पाठीमागे कोणतेच वाहन नसल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा प्रशासन व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
परभणी येथील धान्य वाहतुक करणार्या कंत्राटदाराकडून नेहमीच ट्रकच्या मर्यादेपेक्षा जास्त गव्हु व तांदळाची पोती टाकून वाहतुक करण्याचा प्रकार घडत असतो. शासनाच्या नियमाप्रमाणे ओव्हरलोड धान्याची वाहतुक करण्यास बंधन घालून देण्यात आलेले आहे. (Government grain) कंत्राटदाराला तशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. परंतु कंत्राटदार हा माल गोदामात टाकण्यासाठी वापरण्यात येणार्या ट्रकची वाहतुक क्षमता कमी असताना अधीकची पोती टाकून वाहतुक करण्याचे प्रकार घडत असतात.
सोमवारी एका ट्रकमध्ये ओव्हरलोड गव्हाची पोली भरुन ट्रक जिंतूर रोडकर निघाला. ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा खूप गव्हाची पोती भरल्याने पाठीमागिल जवळपास वीस पोती ही एकदम खाली पडली. ट्रकच्या चालकाला उशिरा ही बाब लक्षात आली. ट्रकच्या पाठीमागे कोणतेही वाहन नसल्याने जिवीत हाणी झाली नाही. ही (Government grain) घटना तशी भंयकर होती. रस्त्यावर ही पोती पडल्यानंतर धान्याची नासाडी देखील झाली. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासन व उप विभागीय परिवहन कार्यालयाने जातीने लक्ष घालून संबंधित कंत्राटदार व ट्रक एम.एच. १३ ए.एक्स. ४७४७ च्या चालकावर कारवाई करणे गरजेचे आहे.