बीड: पत्नीला अर्धांगवायूचा आजार झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू !

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

25 Nov 2024, 4:31 pm

Updated on

25 Nov 2024, 4:31 pm

गेवराई : पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच बीडमधील गेवराईच्या पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी (ता २४) रोजी अंबड येथे घडली.

बाजीराव रंगनाथ बंडेकर (वय ७८) रा.सेलू ता. गेवराई जि.बीड असे मृत झालेल्या पतीचे नाव असून, त्यांची पत्नी सुदामती बंडेकर यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने अंबड (जि जालना) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रविवार (ता २४) अंबड येथील मुलीकडे पत्नी असल्याने बाजीराव बंडेकर गेले होते. मात्र तेथे गेल्यावर त्यांना आपल्या पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच ते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. मात्र, पत्नीची परिस्थिती पहाता रुग्णालयातून बाहेर येताच त्यांना पत्नीचे दुःख सहन झाले नसल्याने बाजीराव बंडेकर यांना रुग्णालयाच्या बाहेर हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य स्व.शेषेराव बंडेकर यांचे भाऊ तर मदन बंडेकर यांचे ते चुलते होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article