टीम इंडियाने पर्थमध्ये इतिहास घडवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी लोळवलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 238 धावांवर गुडघे टेकले. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात हा विजय मिळवला. जसप्रीत बुमराह याने या विजयासह इतिहास घडवला आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.