जर आपल्या शहरात एक दिवस जरी सुर्य उगवला नाही तर आपली काय अवस्था होईल. आपली दररोजची कामे कशी होतील. सुर्याच्या प्रकाशाशिवाय कडाक्याच्या थंडीतील जीवन कसे असेल याची कल्पना देखील करवत नाही. परंतू अमेरिकेतील एका शहरात तब्बल दोन महिने आता सुर्यदेव दर्शन देणार नाहीत…काय आहे हा प्रकार..
अमेरिकेतील अलास्कातील एक छोटे शहर आहे. त्याचे नाव उत्कियागविक ( Utkiagvik ) आहे. या शहरात आता दोन महिन्यानंतरच सुर्य दिसणार आहे. या शहरात शेवटचा सुर्योदय १८ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्यानंतर आता ६४ दिवसांनी म्हणजे २२ जानेवारी रोजी सुर्योदय होणार आहे, म्हणजे ६४ दिवस येथे अंधार असणार आहे.
बैरो नावाने ओळखले जाणारे उत्कियागविकमध्ये ( Utkiagvik) सुमारे पाच हजार लोक रहातात. हे शहर आर्टीक्ट महासागराजवळ अलास्काच्या उत्तरेला आहे.अत्यंत उत्तरेला असल्याने दरवर्षी येथे अनेक दिवस सुर्याचे दर्शन होत नाही. १८ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी १.२७ वाजता सुर्यास्त झाला होता. आता ६४ दिवसांनी २२ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजता सुर्य उगवणार आहे. तोही केवळ ४८ मिनिटांसाठी त्यानंतर हळूहळू दिवस मोठा होत जाईल.
पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरताना २३.५ डिग्री झुकलेली आहे. त्यामुळे सुर्याभोवती फिरताना या ठिकाणी सुर्याचा प्रकाश विशिष्ट दिवसात पडत नाही.त्यामुळे पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर गोलार्धाच्या टोकाला वर्षातुन काही दिवस पोलार नाईटची घटना घडत असते. दरवर्षी अशी वेळ येते जेव्हा काही दिवस सुर्याचे दर्शन होतच नाही.पोलार नाईटचा अवधी हा २४ तास ते दोन महिन्यांपर्यंत असू शकतो.
तीन महिने सुर्यास्त होत नाही
खास गोष्ट म्हणजे जसे सुमारे दोन महिने येथे सुर्यादय होत नाही, तसेच सुर्यास्ताशिवाय देखील येथील लोक आपले जीवन व्यतित करत असतात. ११ मे २०२५ ते १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत बॅरो आणि उत्कियागविकमध्ये ( Utkiagvik) सुर्यास्त होणार नाही. पृथ्वीच्या नॉर्थ आणि साऊथ पोलवर अनेक भागात असे होते.
सुर्यादयाशिवाय या शहरातील जीवन कसे जगत असतात लोक असे तुम्हाला वाटेल. प्रशासनाने तर्फे येथे दिवसाच्या विजेचे दिवे लावून अंधार दूर केला जातो. परंतू बराच काळ सुर्याशिवाय येथे राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असताो. या क्षेत्रात अतिशय थंडी पडत असते. तापमान शून्य डिग्रीच्या खाली देखील जात असते.