मुंबईत 2 लाख 87 हजार मतदार वाढले; एक लाख कर्मचारी ऑन इलेक्शन डय़ुटी

3 days ago 2

मुंबईत विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असून पालिकेचे  एक लाखपैकी 60 हजार, तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40 हजारांवर कर्मचारी निवडणूक डय़ुटीवर ऑन फिल्ड आहेत. यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली असून सुविधांची जबाबदारी पालिकेवर निवडणूक आयोगाकडून सोपवण्यात आली आहे.

मतदान सुरळीत पार पडण्यासाठी पालिका, पोलीस आणि निवडणूक आयोगाचा ‘कंट्रोल रूम’ आणि सर्व 36 विधानसभा क्षेत्रासाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक ‘स्ट्राँग रूम’ तैनात करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दिली.

भूषण गगराणी यांनी पत्रकार पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पालिकेकडून निवडणुकीसाठी सुरू असलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. शिवाय मुंबईतील 36 मतदार संघातील मतदारांच्या संख्येपासून विभागवार तपशीलवार पाहितीही जाहीर करण्यात आली. पालिकेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मतदान जागृती करण्यात आली असून मतदानासाठी बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, बँक पिंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, निवृत्तीवेतन दस्तऐवज, दिव्यांग ओळखपत्र, आधार कार्ड, मनरेगा ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा कार्ड अशा प्रकारचे वैध ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आचारसंहिता भंगाच्या हजारांवर तक्रारी

सी-व्हिजिल अॅपमध्ये मुंबई उपनगर जिह्यामध्ये 615 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या.  कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने दखल पात्र आणि अदखलपात्र असे 30 गुन्हे दाखल करण्यात आले.

मतदान आणि निवडणूक कालावधी कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये यासाठी 25 हजार 696 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान पेंद्रावर किमान पाच पोलिसांचा पहारा राहणार आहे.

347 कोटी 21 लाखांची रोकड, दागिने, दारू जप्त

मुंबईत 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मुंबई शहर विभागात 32974000 तर उपनगर जिह्यात 12 कोटी 60 56 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर शहर विभागात 2800 लिटर 12 लाख 89 हजारांची तर उपनगर जिह्यात 39,385 लिटर 1 कोटी 10 लाख 77 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. शिवाय शहरात 6 कोटी 97 लाख 70 हजारांचे मौल्यवान धातू आणि उपनगर जिह्यात 238 कोटी 67 लाख 8 हजारांचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले.

मुंबईत लोकसभा निवडणूक 2024 नंतर मुंबई शहर जिह्यात 53372 तर मुंबई उपनगर जिह्यात 53372 मतदार असे एकूण 2 लाख 91 हजार 87 मतदार वाढले आहेत.

मुंबईत आता एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 वर पोहोचली असून यामध्ये 54 लाख 67 हजार 361 पुरुष तर 47 लाख 61 हजार 265 महिला आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article