​​​​​​​मुख्यमंत्र्यांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होऊ शकते:प्रकाश आंबेडकर यांचा धनगर आरक्षणावरून इशारा; लाडकी बहीण योजनेवरही निशाणा

2 hours ago 1
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणावरून स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकवून घेऊ नये. त्यांच्यावरही अ‍ॅट्रोसिटी दाखल होऊ शकते, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरही निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, धनगर समाजाने आपल्या पायावर दगड मारून घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आपला निर्णय दिला आहे. आम्ही काही धनगर नेत्यांना कोर्टात न जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण धनगर व धनगड हे दोन्ही समाज वेगवेगळे आहेत, ते एकत्र आणता येत नाहीत. त्यामुळे थेअरीच्या दृष्टिकोनातन निकाल काढता येणार नाही. मुख्यमंत्र्यांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होऊ शकते धनगर आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सावधपणे बोलले पाहिजे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकवून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे तुम्ही स्वतःला अडचणीत आणू नका. तुमच्यावरही अ‍ॅट्रोसिटी दाखल होऊ शकते. त्यांनी कायद्याप्रमाणे वागावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आदिवासींचा निधी लाडक्या बहिणींना प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे जे काही करण्यास निघाले आहेत ते कायदेशीर नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सव्वा लाख बोगस आदिवासी आढळलेत. आदिवासीचे मोर्चे, भरती, जागा ताबडतोब भरणे या सर्व गोष्टी झाल्या. पण आता आदिवासी समाजाचे बजेट लाडक्या बहिणींसाठी वर्ग करण्यात आले. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांची ताकद प्रकाश आंबेडकरांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शरद पवार चालवत असल्याचाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. सुरुवातीला त्यांचे आंदोलन देवेंद्र फडणवीस चालवत असल्याचे आरोप झाले. त्यानंतर यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. त्यानंतर आता अखेर शरद पवार यांचे नाव पुढे आले. त्यामुळे आता जरांगे यांनी निवडणूक लढली नाही, तर शरद पवारच जरांगेंचे आंदोलन चालवतात हा स्टँड पक्का होईल. हे ही वाचा... उद्धव ठाकरे - फडणवीस यांची 'मातोश्री'वर गुप्त भेट:संजय राऊतही दिल्लीत जे. पी. नड्डांना भेटले, वंचित नेत्याच्या दाव्याने राजकीय खळबळ मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजपतील राजकीय कटुता सध्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. असे असताना उद्धव ठाकरे व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येते गुप्त भेट झाल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे. वंचितच्या या दाव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article