मुलाच्या प्रेम प्रकरणातून 'ब्लॅकमेल' केल्याने मुलाच्या बापाने आपले जीवन संपविले. File Photo
Published on
:
02 Oct 2024, 7:00 pm
Updated on
:
02 Oct 2024, 7:00 pm
नंदुरबार : प्रेम प्रकरणातील मुलीशी तुमच्या मुलाला लग्न करायला सांगा, असा तगादा मुलाच्या वडिलांना लावण्यात आला. तसेच दहा लाखाची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून मुलाच्या वडिलांनी बुधवारी (दि.२) झाडावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कनिलाल मांगिलाल गावीत (वय ४९) असे मृताचे नाव आहे.
प्रेमप्रकरणावरून तुमच्या मुलाला मुलीशी लग्न करायला सांगा, असा तगादा लावण्यात आला. तसेच मुलाच्या वडिलांना दहा लाखाची मागणी करण्यात आली. वारंवार पैशाची वाढवून मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून नैराश्येतून मुलाच्या वडिलांनी परिसरातील झाडाला गळफास घेऊन बुधवारी आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी अधिकारी विवेक पाटील करत आहेत.